gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ऑनलाइन ‘झेप’ युवा सांस्कृतिक महोत्सव संपन्न विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाची पूर्व तयारी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ऑनलाइन ‘झेप’ युवा सांस्कृतिक महोत्सव संपन्न विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाची पूर्व तयारी

प्रतिवर्षी ऑफलाईन पध्दतीने होणारा आणि तरुणीचे मुख्य आकर्षण असलेला ‘झेप’ हा महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव या वर्षी कोविड आपत्तीत होऊ शकत नाही. मात्र विद्यापीठस्तरीय कला स्पर्धांची तयारी व विद्यार्थी कलागुणांना संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शासकीय व विद्यापीठ नियमांचे पालन करीत ऑनलाइन युवामहोत्सवाचे अभूतपूर्व आयोजन करून २५ पेक्षा जास्त कलाप्रकारांची ऑनलाइन माध्यमातून स्पर्धा घेऊन तसेच त्यांचे आभासी थेट प्रक्षेपण करून युट्यूब, इन्स्टाग्राम फेसबुक, गुगल, गोगटे कलांगण, जीजेसी कल्चरल अशा प्रसार माध्यमातून ऑनलाइन करून युवा सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अशा प्रकारचे आभासी माध्यमांद्वारे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रथम सन्मानही प्राप्त केला.

या सांस्कृतिक युवा महोत्सवात रांगोळी, पेंटिंग, पोस्टर, फोटोग्राफी, गीतगायन, नृत्य, स्केच, कॅलीग्रफी, दांडेकर चषक, भाटवडेकर चषक, मेहंदी, मिमिक्री, काव्य वाचन, कथाकथन, वादविवाद, आदी स्पर्धात्मक कार्यक्रमांबरोबरच फन इव्हेंट, फॅशन शो, गेमिंग, व्हर्सटाइल पर्सनॅलिटी, कॉटेस्ट अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमांचाही समावेश होता.

ऑनलाइन माध्यम असल्याने विद्यार्थ्यांमध्येही नवी उत्सुकता होती आणि त्यामुळे स्पर्धाही रंगतदार झाल्या. ऑनलाइन माध्यमांमुळे स्पर्धक आपल्या घरातूनच सहभागी झाले. विद्यार्थी कलागुण स्पर्धासोबत काही मनोरंजनात्मक स्पर्धांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
सदर सांस्कृतिक युवा महोत्सवात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांतील विजेते खालीलप्रमाणे आहेत. कोलाज- हृषीकेश बाईत, सानिका कदम आणि तनया पालकर; रांगोळी- अनुष्का दरे आणि ख़ुशी शिंदे प्रथम, शुभम वाडेकर व मीनल किंजळे द्वितीय तर कल्पिता सागवेकर यांनी विजेतेपद पटकावले; क्रिएटीव्ह फोटोग्राफी- आदित्य श्रीरंग, रितेश अलीम आणि गायत्री भुवड; नॅचरल फोटोग्राफी- स्नेहल कोकणी, चिन्मय पांचाळ, तेजस रेडीज; कॅन्डीड फोटोग्राफी- दीप जाधव, अक्षता खामकर, तुषार यादव; पोस्टर मेकिंग- अथर्व आवटी, आदित्य भट, सुरज पवार; मराठी कॅलीग्राफी- आकाश मंचेकर; इंग्रजी कॅलिग्राफी- दिनिया मुल्ला; पेंटिंग- मानसी आठवले, शिवानी पांचाळ, सुहानी गुरव; स्केच- ओंकार कांबळे, शिवानी पांचाळ, चैतन्य पांचाळ; मेहंदी- दानिया मुल्ला, संस्कृती तुळसणकर, साक्षी रेवाळे; गीत गायन- हृषीकेश आपणकर, सिद्धी कदम, श्रेयस माईण, सायली मुळ्ये; व्हिपीसी- विद्यार्थिनींमध्ये श्रुती बापट, सिद्धी दसाना , मोहिनी मानकरतर विद्यार्थ्यांमध्ये सोहम शिंदे, आरफत हुनेरकर, निखिल आचरेकर; वादविवाद- सीमा दसाना, अन्विक्षा थोरात व तेजस खरे; कथाकथन- पर्णिका तिवरेकर, स्नेहल कोकणी व प्रीती सावंत; वक्तृत्व- सीमा दसाना, अन्विक्षा थोरात व सुकन्या सावंत; काव्यवाचन- वृषाली काळे, हर्षिता खानविलकर व याचिका जावकर.

नाट्य कलाविष्कार प्रकारात बहुचर्चित आणि मानाचा ‘दांडेकर सन्मान चषक’ विद्यमान वर्षी श्रेयस माईण याने पटकावला. अपूर्वा आचार्य द्वितीय तर साक्षी कोतवडेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. भाटवडेकर चषक स्पर्धेत शुभम शिवलकर आणि श्रेयस माईण ही जोडी विजेती ठरली, शुभम आंब्रे व साक्षी कोतवडेकर हे द्वितीय तर आदित्य पवार आणि सुयश जाधव ही जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. स्टॅडअप स्पर्धेत श्रेयस माईण प्रथम तर तेजस खरे व संकेत हातणकर हे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

कथाकथन व काव्यवाचन स्पर्धेकरिता मुंबई येथील प्रा. संध्या सुर्वे, सुप्रसिद्ध निवेदिका सायली खेडेकर; गीतगायनकरिता श्री. निलेश सावंत; व्हीपिसी व फॅशन शोकरिता अंकिता राजवाडकर व शलाका संधू; फोटोग्राफी स्पर्धेकरिता श्री. प्रसन्न महाडिक; फाईन आर्ट स्पर्धेकरिता श्री. मिलिंद मिरकर; गटचर्चा स्पर्धेकरिता मधुरा दाते; वादविवाद स्पर्धेकरिता आकाशवाणीवरील श्री. श्रीनिवास जरंडीकर व पत्रकार ज्योती मुळ्ये यांनी वरील विविधप्रकारच्या स्पर्धांकरिता परीक्षक म्हणून काम पहिले. अनेक परीक्षक हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. महाविद्यालयाच्या या नियोजनबद्ध ऑनलाइन स्पर्धेचे कौतुक परिक्षकांमार्फत करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

झेप सांस्कृतिक महोत्सव समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांचे काटेकोर नियोजन आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन यांतून महाविद्यालयातील निवडक प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी व विविध स्पर्धांचे विद्यार्थी समन्वयक अशा छोट्या समूहांद्वारे सर्व कार्यक्रमांचे आयोजन, मांडणी, ऑनलाइन प्रसिद्धी करण्याचे ठरले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. कोणत्याही सांघिक कलाविष्काराऐवजी वैयक्तिक कलाप्रकारांचा समावेश झेप युवा महोत्सवात करून विद्यार्थी गुणकौशल्यास प्रेरित करण्यात आले. ऑनलाइन माध्यमांमुळे ‘लेट्स गो सोशियल विथ सोशियल डिस्टन्सिंग’ या ब्रीदवाक्याची पूर्तताही या युवा झेप सांस्कृतिक महोत्सवाद्वारे करण्यात आली.

Comments are closed.