gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्कॉलर कट्टा सोल्युशन्स प्रा. लि.च्या मुलाखतींचे यशस्वी आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेलतर्फे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी स्कॉलर कट्टा सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीमध्ये ‘युनिट हेड’ या पदांकरिता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये १७ विद्यार्थी सहभागी झाले होते; पैकी कंपनीतर्फे दोन विद्यार्थ्यांची निवड केली गेली.

सदर कॅम्पस ड्राईव्हच्या यशस्वी आयोजनाकरिता सामान्वक डॉ. रुपेश सावंत तसेच त्यांचे सहकारी डॉ. उमेश संकपाळ, डॉ. रामा सरतापे यांनी काम पहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.