gogate-college

गो. जो. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी भाषा दिवस’ साजरा

गो. जो. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी भाषा दिवस’ साजरा

भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात २७ फेब्रुवारी हा मराठी साहित्याचा मानदंड असणारे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रंथालयात मराठी भाषा, मराठी साहित्याचे विविध प्रकार यांचा समावेश असलेले ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते; सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कला शाखाप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सीमा वीर, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. दिवाकर करवंजे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, आजचा दिवस आपल्यासाठी खुप महत्वाचा आहे. मराठी भाषेचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे. आज येथे सादर झालेले मराठी भाषा गीत अतिशय अप्रतिम असून त्याचे चिंतन करून आपण आपल्या मायबोलीची मान अभिमानाने उंचावली पाहिजे; असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच त्यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या नेटक्या आयोजनाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

महाविद्यालयाच्या मराठी विभागाने मराठी साहित्यातील अजरामर अशा विविध कवितांचे पोस्टर्स प्रदर्शित केले होते. पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विभगातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गीत आणि निवडक कविताही सादर केल्या. कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. निधी पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.