gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ३ ते ५ एप्रिल २०२३ रोजी प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ३, ४ व ५ एप्रिल २०२३ या कालावधीत महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे प्रायोजक एम.एस.एफ.डी.ए. (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी) असून आय.आय.एस.इ.आर., पुणे या संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षात येणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, वर्गात शिकविण्याच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणाऱ्या नवनवीन पद्धती, कृती केंद्रित अभ्यासपद्धती, वर्गातील तसेच प्रयोगशाळेतील प्रभावी देवाणघेवाणीसाठी आवश्यक असलेल्या नवीन पद्धती, मूल्यमापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती यासर्वांबाबत या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

कार्याशाळेविषयी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या resgjcrtn.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.  गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

 

Comments are closed.