gogate-college-autonomous-logo

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्ग परिचय शिबिराचे’आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम

आपल्या परिसरातील परिसराविषयी जणीव जागृती निर्माण होण्याच्या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे एका निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ व १९ एप्रिल २०२३ रोजी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील.

निसर्ग परिचयासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, पर्यावरण प्रकल्प विषयक मार्गदर्शन, पर्यावरण पूरक वस्तू निर्मिती या संदर्भातील सत्रांचे आयोजन शिबिरादरम्यान करण्यात आले आहे. निसर्ग परिचयाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी निसर्ग सहलीचे आयोजनही सदर शिबिरात करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. शरद आपटे; मोबा. ९४२३२९२०९५ किंवा डॉ. सोनाली कदम मोबा. ९४२०५२४६४६ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.