gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘गुंतवणूक जागरूकता’ कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘गुंतवणूक जागरूकता’ कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि प्लेसमेंट सेलशी सालग्नित नॅचरल स्टॉक एक्सचेंज व सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘गुंतवणूकदार जागरूकता’ कार्यक्रम वाणिज्य शाखेतील बी.कॉम. अकौंटिंग अँड फायनान्सच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. नॅचरल स्टॉक एक्सचेंज व सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. या आस्थापनांतर्फे श्री. अमित फाटक व श्री. संदीप वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी १२७ विद्यार्थी उपस्थित होते. अकौंटिंग अँड फायनान्सचे विभाग प्रमुख प्रा. सुहास नागले व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यास विशेष मार्गदर्शन केले.

Comments are closed.