gogate-college

मुंबई विद्यापीठ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विजेतेपद

मुंबई विद्यापीठ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विजेतेपद

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन विभागीय पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने विजेतपद पटकावण्याचा मान संपादन केला आहे. बॅ. बि. के. महाविद्यालय, वेंगुर्ला येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस. पी. के. महाविद्यालय, सावंतवाडी संघाचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत विजय संपादन केला. या स्पर्धेत विभागातील चौदा संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघात गौरांग कुर्टे, मिनार कुर्टे, विनायक सनगरे, अभिषेक मालगुंडकर, मुकेश सनगरे, स्वराज सावंत, हृत्विक पाटील, ओंकार केदार, विशाल पाथरे, रुद्र म्हस्के, दुर्गेश सावंत, यश मांडवकर यांचा समावेश होता.

विजेत्या संघाचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. ओंकार बाणे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.