gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान शाखेचे प्राचार्य विवेक भिडे, श्री. नंदकुमार पटवर्धन, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा बेर्डे, गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते.

यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आणि अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या; यात विभागातील ७० विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. प्रभात कोकजे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. महेश नाईक आणि प्रा. डी. आर. वालावलकर यांनी काम पहिले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी ‘एड्स जनजागृती पथनाट्य’ सदर केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, जैवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा घड्याळे, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. रश्मी भावे, विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती दिन’ साजरा
h
Comments are closed.