gogate-college

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.एम.एस. शाखेचा निकाल जाहीर.गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा निकाल १००%

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.एम.एस. शाखेचा शैक्षणिक वर्ष २०२०-०२१चा निकाल जाहीर झाला असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा निकाल १००% लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सुयश प्राप्त केले आहे. विभागात प्रथम येण्याचा मान नील संतोष जैन याला मिळाला तर दर्शन जितेंद्र जैन आणि चिन्मय योगीन सरदेशपांडे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थी आणि विभागातील मार्गदर्शक प्राध्यापक यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी तसेच उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मकरंद साखळकर, विभाग प्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.