gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा

प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जागतिक मैत्री दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आय.क्यू.सी., परिवर्तन संस्था, सातारा आयोजित मानसमैत्री आणि विवेकवाहिनी, वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हा समुपदेशनावर आधारित ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ रेश्मा कचरे, मानसमित्र कृतार्थ शेवगावकर यांनी तरुणांमधील मैत्री, तारुण्याच्या काळातील आकर्षणे, व्यसने, निखळ आणि जबाबदारीने वागण्यास लावणारी मैत्री या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. सीमा कदम यांनी केले. महाविद्यालयीन जीवनात मैत्रीचे महत्त्व समजून यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करणात आल्याचे त्यांनी नमूद केले. उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक आणि उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाला विभागातील प्रा. भोसले, प्रा. खांडके, प्रा. पिलणकर तसेच विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. विद्यार्थी प्रातिनिधी महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी बुशरा खान हिने आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.