gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

कोकणातील प्रथितयश अशा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्या शाखांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये कॉमर्स (अकौंटिंग/फायनान्स), बी.एम.एस., विज्ञान शाखेत कंप्यूटर सायन्स, आय.टी., बायोटेक्नॉलॉजी. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री या विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून दि. १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत इनहाउस कोटामधील (inhouse) विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या https://resgjcrtn.com/ या वेबसाईटच्या संपर्कात राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.