gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय.टी. विभागाची ‘टेक्नोवेव-२०२१’ स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय.टी. विभागाची नुकतीच ‘टेक्नोवेव-२०२१’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आणि आय. टी. मधील दोन विषयांवर सेमिनार घेण्यात आले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ महाविद्यालयांतील १७९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धेत मोहित तेंडोलकर (आठल्ये-सप्रे महाविद्यालय, देवरुख) याने प्रथम क्रमांक, आदित्य जोशी (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) याने द्वितीय आणि भवानी उदियार (मॉडेल कॉलेज, ठाकुर्ली) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेकरिता श्री. शशांक टोळे (आय.टी. प्रोफेसर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर श्री. हृषीकेश सरपोतदार (आय.टी. तज्ज्ञ) यांनी करिअर कौन्सिलिंग आणि श्री. प्रवीण राणे (नेटवर्क इंजिनिअर) यांनी नेट्वर्किंग या विषयावर सेमिनार दिले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आय.टी. विभागातील प्रा. आदिती जोशी, प्रा. तेजश्री भावे, प्रा. विदुला भोसले, प्रा. वरुणराज पंडित, प्रा. ज्योती जाधव, प्रा. मृदुला जोशी आणि प्रा. श्रीनिवास जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रयोगशाळा सहायक शुभम पाटील, निलेश शिंदे यांचेही सहकार्य मिळाले.

स्पर्धेतील सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी,आयटी को-ऑर्डीनेटर डॉ. राजीव सप्रे, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.