gogate-college

जागतिक चलन साप्ताहनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आर्थिक साक्षरता वेबीनार संपन्न

सेबी आणि अर्थशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चलन साप्ताहानिमित्त वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अधिक मागोवा घेता यावा यासाठी ‘आर्थिक साक्षरता’ विषयक अभ्यासक्रमातील घटक इ. विषयांची सखोल माहिती मिळावी या उद्देशाने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वेबीनार आयोजित करण्यात आला.

सेबी ही संस्था जागतिक व देशांतर्गत पातळीवर भांडवल बाजार संदर्भात शिक्षण-प्रीशिक्षण घेत असते. चलनाबाबत सर विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना गुंतवणुकीचे नवनवे मार्ग समजावेत, गुंतवणूक करीत असताना होणारी फसवणूक टाळता यावी. विम्याची आवश्यकता, गुंतवणुकीचा योग्य मार्ग कोणता असायला हवा याबद्दलचे मार्गदर्शन सेबीच्या सल्लागार व एन. डी. पाटील नाईट कॉलेज, मिरज, सांगली येथील डॉ. सोनाली सूर्यवंशी-ककडे; यांनी केले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्व सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या. कला शाखेच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी व्याख्यान आयोजनाकरिता मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांनी हे व्याख्यान यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर वेबिनारचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी घेतला.

Comments are closed.