gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप युवा महोत्सवांतर्गत विज्ञान विषयक प्रदर्शनांचे उद्घाटन

exhibition

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असलेल्या ‘झेप’ सांस्कृतिक युवा महोत्सवांतर्गत विज्ञान विषयक प्रदर्शनांचे उद्घाटन संपन्न झाले. विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, आणि प्राणीशास्त्र या विभागांनी विविध वैज्ञानिक संकल्पना, त्यावर आधारित फनी गेम्स, गणिती विनोद, पुस्तक प्रदर्शन, टेलिस्कोप वापराचे प्रात्यक्षिक, विविध अ‍ॅप्सचा कसा वापर करावा याचे प्रात्यक्षिक, जैवतंत्रज्ञानाची झालेल्या प्रगतीविषयक माहिती असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा या सर्व उपक्रमांना छान प्रतिसाद लाभला. प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन नेव्ही कमांडर अलोक लांजे, कॅ. नीलकंठ खोंड, मेजर विश्वनाथ, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. यावेळी डॉ. सीमा कदम आणि डॉ. मधुरा मुकादम, उपप्राचार्य विवेक भिडे, श्री. बिपीन बंदरकर, श्री. निलेश भोसले, श्री. प्रशांत पवार यांची उपस्थिती लाभली.

रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री रणदिवे प्रथम, राजनीगंधा गोताड द्वितीय आणि दीप्ती कांबळे, मेघा पवार, पर्णिका शिरगावकर यांना तृतीय क्रमांक मिळाला.

तसेच ‘झेप’ सांस्कृतिक युवा महोत्सवांतर्गत गटचर्चा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. संघांमधून एक वक्ता निवडून त्यांची अंतिम गटचर्चा घेण्यात आली. ‘करिअर डेव्हलपमेंटसाठी सांस्कृतिक महोत्सव महत्वाचे आहेत कां?’ या विषयावर ही चर्चा रंगली. यामध्ये ऋषीकेश वैद्य याची उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून अ‍ॅड.संध्या सुखटणकर व दै. लोकसत्ताचे वितरण व्यवस्थापक श्री. हेमंत चोप्रा यांनी केले. यावेळी अ‍ॅड. संध्या सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना विषयाच्या सखोल तयारीबाबत आणि सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रा. जयंत अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असलेल्या ‘झेप’ सांस्कृतिक युवा महोत्सवांतर्गत सर्व तरुणाई सहभागी होऊन विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहे.

exhibition
Science Exhibition
Comments are closed.