gogate-college

देवव्रत मोरे ठरला मानाच्या ‘दांडेकर मानचिन्ह स्पर्धे’चा मानकरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा ‘झेप’ युवा महोत्सवात तरुणाईचा जल्लोष

Dandekar Manchinha Winner

महाविद्यालयीन जीवन आणि कलागुण यांचा संगम असलेला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा ‘झेप’ युवा महोत्सव तरुणाईच्या जल्लोषात सुरु आहे. नाट्य व अभिनय क्षेत्रात महाविद्यालयाला दांडेकर मानचिन्ह अभिनय स्पर्धेचा एक अविरत असा वारसा आहे. या स्पर्धेदरम्यान एकपात्री आणि द्विपात्री अशा बहुरंगी नाट्यछटा सादर करण्यात आल्या. स्पर्धेत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले होते. देवव्रत मोरे हा यावर्षीचा दांडेकर मानचिन्ह स्पर्धेचा विजेता मानकरी ठरला. त्याला स्पर्धेतील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक श्रेयस आपटे आणि अनिकेत आपटे तर तृतीय क्रमांक राधा सोहनी यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण मयूर साळवी, प्रशांत पवार आणि अभिजित मांजरेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘झेप’ युवा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा ‘थीम इव्हेंट’ संपन्न झाला. शास्त्र शाखेणे आयोजित केलेला हा कार्यक्रम होता. यासाठी विषय होता ‘प्रेम: प्रेम म्हणजे प्रेम असत…तुमचं आमचं ‘वेगळ’ असत’ या विषयावर विद्यार्थ्यांनी कविता, गाणी, नृत्य, अभिनय, शायरी असे वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर केले. स्पर्धेत गौरी साबळे प्रथम क्रमांक, हृत्विक सनगरे द्वितीय तर राधा सोहनी आणि शुभम नंदानी यांनी तृतिय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून अभिजित मांजरेकर आणि फहीम वस्ता यांनी काम पहिले. सूत्रसंचालन कस्तुरी भागवत हिने केले.

या महोत्सवात ‘सामाजिक प्रश्न आणि वस्तू व सेवाकर’ या विषयावर विविध विभागांनी पोस्टर प्रेसेंटेशन केले. याशिवाय फाईन आर्टमध्ये पेंटिंग, स्केचिंग, पोस्टर कार्टुनिंग आणि बेस्ट फ्रॉम वेस्ट यांचा समावेश होता. तरुणाईने या स्पर्धेत आपला सक्रीय सहभाग नोंदवला.

Comments are closed.