gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. व इतर प्रथितयश बँकांमध्ये निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या सहयोगाने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झालेल्या ३१ विद्यार्थ्यांपैकी २७ जणांची आय.सी.आय.सी.आय., डी.एन.एस. आणि इतर प्रथितयश बँकांमध्ये विविध उच्च पदांवर नेमणूकीकरता निवड झाली आहे.

प्राथमिक फेऱ्यांमधून यशस्वीरित्या पुढे गेल्यानंतर अंतिम एच.आर. राउंडमध्ये अत्यंत कठीण अशा पर्सनल इंटरव्ह्यूचा अडथळा पार करून या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.