gogate-college

जागतिक महिला दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘थप्पड’ चित्रपटाचे प्रदर्शन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे अतिशय आगळया पद्धतीने ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरात नव्याने सुरु झालेल्या सिद्धिविनायक प्लाज्ञा मल्टिप्लेक्समध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला विकास कक्षातर्फे सवलतीच्या दरात ‘थप्पड या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले. स्त्रीप्रश्नांची अतिशय सुरेख मांडणी असणाऱ्या आणि ‘स्त्रियांचा सन्मान जपणे महत्वाचे आहे’ हा संदेश देणाऱ्या या चित्रपटासाठी अनेक विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिक उपस्थित होते. यानंतर या चित्रपटाच्या विविध पैलूंविषयी, त्यातून जागवणाऱ्या स्त्री समस्यांवरती अॅड. संध्या सुखटणकर आणि डॉ. निधी पटवर्धन यांनी प्रेक्षकांना सहभागी करत चर्चा केली.

श्री. विजय देसाई आणि श्री. चाफळकर यांच्या बहुमोल सहकार्याने या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले. महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. निधी पटवर्धन यांच्या विशेष प्रयत्नांतून हा आगळा कार्यक्रम साकार झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने तरुणाईचे प्रबोधन करणाऱ्या या उपक्रमासाठी महिला विकास कक्षाचे अभिनंदन केले.

Comments are closed.