gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. दीपक जोशी यांना सेवानिवृत्ती शुभेच्छा

आपल्या कार्य तत्परतेने ओळखले जाणारे व प्रामाणिक सेवेचा वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. दीपक जोशी यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती शुभेच्छा देण्यात आल्या. २७ वर्षे, ८ महिने असा दीर्घ सेवेचा कालखंड त्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कुटुंबात मैत्रीपूर्ण वातावरणात घालविला. महाविद्यालयातील परीक्षा विभाग, पतपेढी, महाविद्यालय आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांनी जोशी यांच्या कार्यसेवेचे वर्णन करून प्रामाणिकपणाचा गुणगौरव केला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी जोशी यांच्या निस्वार्थी सेवेचा उल्लेख करून पुढील पिढीसाठी कार्याचा आदर्श असल्याचे सांगितले. डॉ. आनंद आंबेकर यांनी उत्तम व्यवस्थापन आणि परीक्षेसंदर्भात अचूक कामाचा उल्लेख केला. उपप्राचार्या विशाखा सकपाळ आणि पर्यवेक्षक प्रा. अनिल उरुणकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या कुटुंबियांसोबत शुभेच्छा स्विकारून श्री. दीपक जोशी यांनी आभार व्यक्त केले.

सदर निरोप समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या समारंभ समितीमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजनात प्रा. दिवाकर करवंजे यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले

Comments are closed.