gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कॅंपस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागातर्फे दि.२८ डिसेंबर २०२० रोजी खाजगी बँकींग क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये जागांच्या उपलब्धतेनुसार विविध पदांकरिता तसेच निवडपूर्ण प्रशिक्षणाकरिता मुंबईस्थित एन.आय.आय.टी.च्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची प्रक्रिया महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये सेमिनार हॉल येथे पूर्ण केली जाईल. याकरिता महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून पदवी तसेच पदव्युत्त्तर पदवी परीक्षा कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. निवड तसेच मुलाखतीची प्रक्रिया सकाळी ०९.३० वाजता सुरु होईल. मुलाखतीला येताना सोबत मूळ प्रमाणपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो इ. सह बायोडेटा असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर लॉकडाऊननंतरच्या कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करून उमेदवारांनी योग्य ती खबरदारी घ्यावयाची आहे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ आणि डॉ. उमेश संकपाळ ९३५९८७००१८ यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.