gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खारफुटी दिनानिमित्त मंगल उत्सव उत्साहात संपन्न

botany-department-news2-july-2022

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विभाग आणि कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून दि. 23 जुलै ते 26 जुलै 2022 या दरम्यान मंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 26 जुलै 2022 रोजी खारफुटी दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खारफुटी परिसंस्थेमध्ये आढळणारे विविध कीटक पक्षी व प्राणी यांचे सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी खारफुटी परिसंस्थेचे मॉडेल तयार केले होते तसेच तेथे आढळणारे खेकडे व इतर पशुपक्षी यांचे देखील तक्ते तयार करून त्यांची माहिती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना दिली. तसेच खारफुटी परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती त्यांच्यामधील बी रुजण्याची प्रक्रिया व त्यातील विविध त्यातील विविधता यांचे सादरीकरण केले, खारफुटी वनस्पतींच्या सोबत आढळणाऱ्या इतर वनस्पती यांचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्यातर्फे देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या विविध खारफुटीच्या प्रजाती यांचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच कांदळवन कक्ष व कांदळवन कक्षातर्फे केले जाणारे कार्य आणि कांदळवन यांची संरक्षण आणि संवर्धन याची माहिती देखील कांदळवन कक्षाच्या सदस्यांद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रदर्शनाचा लाभ शिर्के प्रशाला, पटवर्धन हायस्कूल तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या.

खारफुटी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम ज. शं. केळकर सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या या डॉ. अपर्णा कुलकर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किरण ठाकूर, कांदळवन कक्ष अधिकारी प्रांजली चोप्रा व त्यांचे सहकारी उपस्थित होते. छायाचित्रण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण दि. 26 जुलै 2022 खारफुटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. यामध्ये प्रथम क्रमांक सानिका पारकर, द्वितीय क्रमांक सर्वेश सनगरे, तृतीय क्रमांक स्वाती शिंदे, उत्तेजनार्थ पारितोषिक अक्षय साळवी व दिनल तळेकर हिने पटकावला. या पारितोषिक वितरणाला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किरण ठाकूर, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी व उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी हे उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान कांदळवन कक्षाच्या प्रांजली चोप्रा यांनी कांदळवन कक्ष तसेच कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना खारफुटीच्या विविध प्रजाती व त्यांच्यामध्ये आढळणारी विविधता याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रामुख्याने कांदळवनातील वनस्पतींचा औषधी उपयोग व इतर उपयोग याबद्दल देखील मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा तेंडुलकर यांनी करताना खारफुटी दिन जागतिक स्तरावर साजरा करण्याची सुरुवात होण्याआधी पासून महाविद्यालयामध्ये खारफुटी संवर्धनाकरता आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमांचा देखील आढावा घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रेंज फॉरेस्ट ऑफिसर कांदळवन कक्ष श्री. किरण ठाकूर यांनी खारफुटी वनस्पतींच्या तोडीमुळे उद्भवणारी पूर परिस्थिती आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व कांदळवनाच्या संरक्षणाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या केलेले उत्तम आयोजन व त्यातील उत्तम सादरीकरण याबद्दल अभिनंदन केले, तसेच खारफुटी वनस्पतीबद्दल आपल्या जवळपासच्या खेडेगावांमध्ये जाऊन तेथे जनजागृती करण्याचे व खारफुटी संवर्धनाकरता प्रयत्न करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातील सहकार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.

Comments are closed.