gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित मंगल उत्सव कार्यक्रमांतर्गत क्षेत्रभेट संपन्न

botany-department-news1-july-2022

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विभाग आणि कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून दि. 23 जुलै ते 26 जुलै 2022 या दरम्यान मंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 23 जुलै रोजी रनपार येथे विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रनपार येथील खारफुटी परिसंस्था पाहणे व त्याच्या संवर्धनाची गरज समजून घेणे हा हेतू होता. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रायझोफोरा म्युक्रोनाटा, रायझोफोरा अपेटला, लुमनित्झेरा, अविसेनिया, एजिसेरास, सेरियोप्स, अकँथस, इ. खारफुटीच्या प्रजाती तसेच खारफुटीच्या सहयोगी वनस्पती आणि तेथे आढळणारे विविध प्रकारच्या खेकड्यांच्या प्रजाती व निवटी आणि इतर कीटक यांचे निरीक्षण केले. तसेच तेथे असणाऱ्या खारफुटी वनस्पती त्यांचे त्या परिसंस्थेतील महत्त्व आणि खारफुटीच्या तोडीमुळे तेथे उद्भवणाऱ्या समस्या याबद्दल जाणून घेतले. या क्षेत्रभेटीदरम्यान वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे, प्रा. अंबादास रोडगे आणि प्रा. ऋजुता गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना खारफुटींच्या प्रजाती व तेथील प्राणी, पक्षी याबद्दल मार्गदर्शन केले. या क्षेत्रभेटीमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे व प्रा. भक्ती सालकर हे सहभागी झाले होते.

मंगल उत्सवांतर्गत विद्यार्थ्यांसाठी खारफुटी परिसंस्थेची निगडित छायाचित्रण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी खारफुटी परिसंस्था व तेथील जैवविविधता यांचे सुंदर चित्रीकरण केले. विद्यार्थ्यांनी या छायाचित्रण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments are closed.