gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग आणि मराठी समाजशास्त्र परिषदेच्या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन

marathi-samajshastra-parishad-snshodhan-patrika-prakashan

र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयआणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सादर झालेल्या शोधनिबंधाच्या संशोधन पत्रिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग हा अत्यंत जुना शैक्षणिक असून, नामवंत आणि सुप्रतिष्ठीत संशोधक-अभ्यासक, प्राध्यापक या विभागाला लाभले आहेत. अध्ययन-अध्यापनाबरोबच संशोधनाच्या क्षेत्रातही विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. समाजशास्त्र विभाग आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ आणि दि. १२ एप्रिल, २०२२ रोजी‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. या परिषदेत राज्यातील सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा संशोधन समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत संपन्न झालेल्या विविध परिसंवादांमध्ये संधोधक-विद्यार्थी, प्राध्यापक-अभ्यासकांकडून भारतीय विकास प्रक्रियेतील अंतर्विरोध, भारतीय समाज: नवे आकलन, नवे दृष्टीकोन, पर्यायी विकास चिंतन आणि भारतीय संविधान, कोकणातील पर्यावरणीय समस्या अशा अनेकविध विषयांवर सुमारे १३९ शोधनिबंधांचे सादरीकर णकरण्यात आले होते. या शोधनिबंधांचे प्रकाशन An International Peer Reviewed and Research Journal Scholarly Research Journal For Interdisciplinary Studies; Vol. – 10, Issue– 53 या नावाने दोन खंडात करण्यात आले असून, त्यातून सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक, संशोधक-विद्यार्थानी आपापल्या शोधनिबंधातून देशातील राजकीय-सामाजिक विकासासंदर्भात विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. या खंडाचे संपादन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून. हे दोन खंड ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रियेच्या संदर्भात मैलाचे दगड ठरणार आहे.

या प्रकाशन समारंभप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे, ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आनंद आंबेकर, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. सचिन सनगरे, श्री. प्रसाद गवाणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.