gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या निसर्गमंडळातर्फे आरेवारे येथे कांदळवन लागवड

mangrove-plantation-nature-club

गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या निसर्गमंडळातर्फे दि. ३० जुलै २०२२ रोजी कांदळवन प्रतिष्ठान, रत्नागिरी आणि वनविभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरेवारे येथे कांदळवन लागवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निसर्ग मंडळाचे संयोजक डॉ. नितीन पोतदार यांनी निसर्ग मंडळाबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर वनाधिकारी श्री. किरण ठाकूर यांनी कांदळवन जतन करण्याची गरज समजावून सांगितली. तसेच क्षेत्रीय संयोजक श्री. स्वस्तिक गावडे व प्रांजल चोप्रा यांनी कांदळवनाची विस्तृत माहिती देताना त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, अधिवास आणि उपयुक्तता यांचा उल्लेख केला.

या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमात २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच डॉ. नितीन पोतदार, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. रश्मी भावे आणि प्रा. अतिका राजवाडकर यांनीही सक्रीय सहभाग घेतला. प्रा. अंबादास रोडगे यांनी आभारप्रदर्शन केले.

सदर उपक्रमाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.