गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: कार्य आणि साहित्य’ या विषयाला अनुसरून वैविध्यपूर्ण ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री नीरजा यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी कवी श्री. अजय कांडर, पत्रकार श्री. सचिन परब उपस्थित होते.
कवयित्री नीरजा यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रंथालयाचे विविध उपक्रम, आधुनिक स्वरूप, विविध सेवा-सुविधा यांचा उल्लेख करून ग्रंथालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, मराठी विभाग प्रमुख आणि वाङ्मय विभागाचे समन्वयक प्रा. शिवराज गोपाळे, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.