gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल’मार्फत आय.सी.आय.सी.आय. बँक आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या त्रिवेणी माळवदे, ऐश्वर्या मांडवकर, निधी जाधव, साईराज सावंत, स्वरदा देशमुख, शीफा बोबडे, स्वरदा देशमुख, अभिषेक साळवी या विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत ‘सिनिअर ऑफिसर’ या पदावर नेमणूक झाली आहे. निवड प्रक्रियेमधील विविध टप्पे आणि त्यांनंतरचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांची बँकेत नेमणूक करण्यात आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले आहे.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयातील वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आतापर्यंत आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी बँकअधिकारी म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी व गोवा याठिकाणी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळत आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी भविष्यातही असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील असा विश्वास व्यक्त केला.

Comments are closed.