gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे निकाल जाहिर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने भारतीय संविधानदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. या स्पर्धेसाठी लोकशाही जीवनाचा आदर्श मार्ग, संविधाननिर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे योगदान, भारतीय संविधानाने काय दिले, भारतीय संविधान: काल, आज आणि उद्या असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक कल्पेश आत्माराम पारधी, प्रथम वर्ष कला; द्वितीय क्रमांक वेदिका विनोद चव्हाण, एम.ए.; तृतीय क्रमांक श्रद्धा लक्ष्मण हळदणकर, प्रथम वर्ष कला; उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून वंशिता अजित भाटकर, प्रथम वर्ष कला आणि गौरी दामोदर लिंगायत, तृतीय वर्ष विज्ञान यांनी उत्तम गुणांसह विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेचा पारीतोषी वितरण समारंभ दि. २६ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेकरिता परीक्षण म्हणून प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. कृष्णात खांडेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. निलेश पाटील यांनी मेहनत घेतली.

सर्व विजेत्या स्पर्धकांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.