gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गोवा येथील राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात सुयश

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्राचा विषय ‘आधुनिक वैद्यकिय निदान पद्धती’ असा होता. सदर चर्चासत्र उच्च शिक्षण आयोग, गोवा आणि शासकीय महाविद्यालय, मार्शेल, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

सदर चर्चासत्रात महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील बॉस्को बोथेलो या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याने ‘क्रॉस प्लॅटफॉर्म अॅप्लिकेशन फॉर मायक्रोब आयडेंटीफीकेशन’ या विषयावरील भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला. या विद्यार्थ्याला प्रा. शुभम पांचाळ यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेतील या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि विभागाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.