gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

महिला विकास कक्ष

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि लायन्स क्लब, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांकरिता ‘आरोग्य तपासणी शिबिराचे’ नुकतेच आयोजन करण्यात आले. सुमारे अडीचशे विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.

बदललेली जीवन शैली, चुकीची आहार पध्दती आणि तंदुरुस्तीच्या चुकीच्या संकल्पना यामुळे अलीकडच्या काळात महाविद्यालयीन तरुणींचे आरोग्य हा काळजीचा विषय बनला आहे. ही बाब लक्षात घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे आणि लायन्स क्लब, रत्नागिरीच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापिका सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करतो. महिलांचे आरोग्य हा महिला सबलीकरणाचा एक प्रमुख घटक असल्याने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविला. लायन्स क्लब, रत्नागिरीच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया बेडेकर आणि डॉ. संतोष बेडेकर यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिली. या तपासणीमध्ये हिमोग्लोबिन, हाडांची घनता, बी.एम.आय. यांचा समावेश होता.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ‘पुढील वर्षात महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून घेण्याचा’ मनोदय व्यक्त केला. विद्यार्थिनींची आरोग्य विषयक स्थिती जाणून आवश्यक समुपदेशन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

‘समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युवतींचे आरोग्य खूप महत्वाचे असून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लायन्स क्लबला महाविद्यालायाबरोबर काम करण्याची संधी प्राप्त झाली’ असे लायन्स क्लब, रत्नागिरीच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया बेडेकर यांनी सांगितले.

या शिबिराला विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. १८७ विद्यार्थिनी आणि ४४ महिला प्राध्यापिकांनी आपला सहभाग नोंदवला.

या शिबिराच्या आयोजानामद्धे लायन्स क्लब, रत्नागिरीच्यावतीने डॉ. संतोष बेडेकर, पीटर डिसुजा, मेयर केमिकल्सचे प्रतिनिधी श्री. कैलास यांनी तर महिला विकास कक्षाच्या वतीने प्रा. रश्मी भावे, प्रा. गौरी पटवर्धन आणि प्रा. मीनल खांडके यांनी महत्वाची भूमिका बजावली.

विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी या शिबिराला उपस्थित होते.

h
महिला विकास कक्ष
Comments are closed.