gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे 'माजी विद्यार्थी स्नेहमेळावा' उत्साहात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी विभागातील माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपली कार्यक्षेत्रे आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात पुढील शिक्षणाच्या संधी इ. विषयांवर उपस्थितांसमोर भाष्य केले. महाविद्यालयात आणि विभागात शिक्षण घेताना आलेले अनेकविध अनुभव आणि आठवणीना उजाळा दिला. सध्या या विभागात शिक्षण घेणाऱ्या व भविष्यात या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन माजी विद्यार्थ्यांनी केले .

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्नेहमेळाव्यास जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे आणि विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. सदर माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले .

Comments are closed.