gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठ मुंबई आणि कोंकण झोन- ४ पुरुष व महिलातायकवॉदो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महीला संघाला ३ सुवर्ण व ३ रौप्य पदके

gjc-success-in-taekwondo-competition

मुंबई विद्यापीठ मुंबई आणि कोंकण झोन-४ पुरुष व महिला तायकवॉदो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या पुरुष व महीला संघाने ३ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य पदक प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठ मुंबई व कोंकण झोन-४ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण झोन पुरुष व महिला तायकवांदो स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. वरील स्पर्धेत पुरुषांचे ७० खेळाडू तर महिलांमध्ये २७ खेळाडू असे तीस महाविद्यालयांचे विद्यार्थी खेळाडूं सहभागी झाले होते.

या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या महीला खेळाडूंमध्ये कु. सानिका नारकर (सुवर्ण पदक); कु. प्रसन्ना गावडे (कांस्य पदक) तर पुरुष खेळाडूंमध्ये 1) कु. सुजल सोळंके (सुवर्ण पदक); कु.वेदान्त चव्हाण (रौप्य पदक); कु. राज सवांतदेसाई (रौप्य पदक); कु. सुमित पवार (सुवर्ण पदक); श्री. साहिल आंबेरकर (रौप्य पदक) या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धे करिता आणि अखील भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो संघ निवड चाचणी करीता कोंकण झोन महिला व पुरुष संघात निवड झाली.

वरील सर्व यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, श्री राकेश मालप, श्री. प्रशांत मकवना, श्री. शारुख शेख यांचे मार्गदर्शन तर श्री. राम करारा, श्री सशांक घडशी यांचे सहकार्य लाभले.

वरील कामगिरीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन सेक्रेटरी श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य. डॉ. पी.पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील व क्रीडा विभागातील सहकारी सेवक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.