gogate-college-autonomous-logo

टी. डब्लू. जे. कंपनी कडून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीस ४० संगणक संच प्रदान संगणकशास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञतापूर्ण देणगी

रत्नागिरी एज्युकेशन संस्था शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था असून अनेक नामवंत माजी विद्यार्थी या संस्थेशी संबंधित आहेत व आजही विविध माध्यमातून जोडले गेलेले आहेत. संस्थेचा अमृत महोत्सव कालखंड चालू असुन त्या निमित्ताने अनेकविध उपक्रम चालू आहेत.

महाराष्ट्रातील नामवंत टी.डब्लू.जे. कंपनीने डेल ऑप्टीप्लेक्सचे ४० संगणक, ०२ ग्राफिक्स कार्ड रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीस भेट दिले. ही भेट देण्यामागे संगणकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी श्री. समीर नार्वेकर, टी.डब्लू.जे. असोसिएट प्रा. ली. चे डायरेक्टर सौ. नेहा नार्वेकर टी.डब्लू.जे. असोसिएट प्रा. ली. च्या डायरेक्टर, श्री. सुरज सोकासने, टी.डब्लू.जे. आयटी सोल्युशन प्रा. ली. चे डायरेक्टर, श्री. प्रसन्न करंदीकर, टी.डब्लू.जे. फाउंडेशनचे डायरेक्टर, रत्नागिरी शाखा अधिकारी श्री. सुशांत विचारे यांचे मोलाचे योगदान आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्यादृष्टीने सदैव कार्यरत रत्नागिरी एज्युकेशन संस्थेत विदयार्थी कौशल्य विकास आधारित अनेक उपक्रम सुरु आहेत. यातूनच नोकरी, व्यवसाय आदी विषयांशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतात याचीच जाणीव ठेऊन अनेक माजी विद्यार्थी संस्था व महाविद्यालयास अनेक पद्धतीने आर्थिक तसेच वस्तुरूपाने मदत करीत असतात. माजी विद्यार्थ्यांच्या अशा कृतज्ञतापूर्ण भेटीतूनच त्यांची संस्थेबद्दल व महाविद्यालयाबद्दलची आस्था दिसून येते. विद्यार्थांच्याप्रती असणारी संस्था व महाविद्यालयाची कार्यनिष्ठा व त्याचेच फलित भेट रूपाने प्राप्त झालेली संसाधने म्हणून पाहता येईल. यासाठी संगणकशास्त्र विभागप्रमुख श्रीम. अनुजा घारपुरे, श्री. समीर नार्वेकर यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नातून ही देणगी संस्थेस प्राप्त झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी टी.डब्लू.जे. कंपनी असोसिएट प्रा. ली. चे डायरेक्टर श्री. समीर नार्वेकर व सौ. नेहा नार्वेकर यांचेप्रती आभार व्यक्त केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर यांच्या उपस्थितीत श्री. सुरज सोकासने व श्री. प्रसन्न करंदीकर यांनी हे संगणक संस्थेस प्रदान केले.

Comments are closed.