gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठ मुंबई आणि कोंकण झोन पुरुष व महिला बुद्धीबळ स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालययाचे सुयश

मुंबई विद्यापीठ मुंबई व कोंकण झोन-4 आणि जे. एस. एम. आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय अलिबाग, पेण, यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण झोन महिला व पुरूष बुद्धिबळ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. वरील स्पर्धेत महिलांचे तेरा संघ तर पुरुषांचे अठरा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या महीला संघाने सांघिक विजेतेपद पटकावले तर पुरुषांच्या संघाला 4 था क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेत कुमार निरंजन तेंडुलकर आणि कुमारी अवंती काळे या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला बुद्धिबळ स्पर्धे करिता आणि अखील भारतीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धे करीता संघ निवड चाचणी करीता कोंकण झोन महिला व पुरुष संघात निवड झाली. मुंबई विद्यापीठ मुंबई आणि कोंकण झोन-४ पुरुष व महिला बुद्धीबळ स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या महीला संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले तर पुरुष संघाने चौथा क्रमांक प्राप्त केला. तसेच निरंजन तेंडुलकर या विद्यार्थ्याने व्यक्तिगत पुरुष बुद्धीबळ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.

महिला बुद्धिबळ संघ मध्ये अनुक्रमे अवंती काळे, चेत्राली ओक, सुरक्षा महाकाळ, तोडणकर पवित्रा, तर पुरुष बुद्धीबळ संघात अनुक्रमे निशांत पाटील, ऋत्विक मुसळे, निरंजन तेंडुलकर, प्रदनेश रिसबुड, ऋग्वेद सरजोशी सहभागी झाले होते. वरील यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन प्रा. राकेश मालप यांचे सहकार्य लाभले.

वरील कामगिरीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, सेक्रेटरी श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य. डॉ. पी.पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील व क्रीडा विभागातील सहकारी सेवक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.