gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी ‘नेचर वॉक’चे आयोजन

रत्नागिरी शहराच्या परिसरातील पठारे सद्या विविधरंगी रानफुलांनी बहरून गेली आहेत. साड्यावरील रानफुलांचे सौंदर्य टिपण्यासाठी आणि नैसर्गिक ठेव्याची ओळख करून घेण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी फणसोप सडा येथे ‘निसर्ग फेरीचे’ (‘नेचर वॉक’) आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थी, शिक्षक तसेच निसर्गप्रेमी नागरिक या निसर्ग फेरीत सहभागी होऊ शकतात. पठारावरील कीटकभक्षी वनस्पती, औषधी वनस्पती, स्थानिक आणि उच्च स्थानिक वनस्पतींबद्दल माहिती करून घेण्याची संधी यानिमित्ताने निसर्ग प्रेमींना उपलब्ध होणार आहे.

सदर निसर्गफेरीत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता फणसोप हायस्कूल, फणसोप सडा येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्रा. शरद आपटे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्याशी ९४२३२९२०९५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सर्व निसर्गप्रेमींना केले आहे.

Comments are closed.