gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठ मुंबई  अंतर्गत कोंकण झोन- 4  पुरूष टेबल टेनिस स्पर्धा २०२२ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुषांच्या संघाने विजेतपद पटकावले

gjc-sports-dept

दि. 26/8/2022 रोजी मुंबई विद्यापीठ मुंबई, कोंकण झोन-4 आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रत्नागिरी  यांच्या  स्टुक्त विद्यमाने कोंकण झोन- 4 पुरूष टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या टेबल टेनिस हॉल मध्ये करण्यात आले होते. कोंकण झोन-4, मधून या स्पर्धेला पुरूष  चे सहा संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना  पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेज, पनवेल विरुद्ध गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी या संघात झालेल्या संघर्षमय सामन्यात  गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुषांच्या संघाने बाजी मारत पहिले मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत कोंकण-4 पुरूष टेबल टेनिस 2022 स्पर्धेचे विजेतपद पटकावले. महाविद्यालयाच्या टेबल टेनिस पुरुष संघाचे नेतृत्व कु. अमेय सावंत, कुं. साळवी, कु. ऋग्वेद सर जोशी, कु. राणे इ. नेतृत्व केले होते. वरील यशस्वी खेळाडूंना  महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे  तसेच प्रा. राकेश मालप.  प्रा. श्रीपाद गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील कामगिरीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन,
सेक्रेटरी श्री. सतीशजी शेवडे,जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागाचे  उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील व क्रीडा विभागातील  सर्व सहकारी  सेवक, कर्मचारी  यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.