gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गणित विभागाच्या भित्तीपत्रकाचे अनावरण

gjc-maths-department-programme-2

gjc-maths-department-programme-1गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे दरवर्षी दि. १५ ऑगस्ट व दि. २६ जानेवारी या दिवशी भित्तीपत्रक प्रदर्शित केले जाते. या उपक्रमामागे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी आणि गणित विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या नियमित अभ्यासक्रमाबाहेरील गणित विषयातील माहिती संकलित करावी असा उद्देश असतो.

यावर्षी दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी तृतीय वर्ष गणित विषयाच्या विद्यार्थ्यांनी “Use of Mathematics in Cryptography” या विषयावरील माहिती संकलित करून भित्तीपत्रक तयार केले. या उपक्रमात तृतीयवर्ष गणित विषयाचे ३२ विद्यार्थी सहभागीझाले.

दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी या भित्तीपत्रकाचे अनावरण महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तृतीय वर्ष गणित विषयाची विद्यार्थिनी कु. वृषाली मांडवकर हिने या भित्तीपत्रकाविषयी माहिती सांगितली. या उपक्रमासाठी गणित विभागप्रमुख प्रा. डी. पी. करवंजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Comments are closed.