gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचे मुंबई विद्यापीठ परीक्षेत सुयश

आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी पदवी परीक्षेत उत्तम गुणांसह यश संपादन केले. तृतीय वर्ष वाणिज्य (बी.कॉम) विभागाच्या परीक्षेमध्ये एकूण ३९२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते; त्यापैकी ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा एकत्रित निकाल ९९.४९% इतका लागला आहे. महाविद्यालय स्तरावर कु. हेमांगी गुरुनाथ दांडेकर CGPA 9.98 गुणांसह प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर कु. अदिती संदेश नागवेकर CGPA 9.97 गुण व कु. मुग्धा सुहास पाटणकर CGPA 9.88 अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी आहेत.

महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागातील विद्यार्थ्यांनी देखील उत्तम गुणांसह आपल्या यशाची छाप पडली. विभागातील ६४ विद्यार्थ्यांपैकी सर्वांनी उत्तीर्ण होत एकत्रित निकाल १००% लागला आहे. यात १७ विद्यार्थी A+ श्रेणी, ३७ A श्रेणी, १० B+ श्रेणी विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. कु. अल्फिया आयाज सोलकर हिने CGPA 9.86 गुणांसह महाविद्यालय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला, तर सनम साजिद बोरकर CGPA 9.73, कु. दसिया रवूफ माजगावकर CGPA 9.72 यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महाविद्यालयाच्या बी.कॉम. अकौंटिंग अॅड फायनान्स या विभागातील १२९ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण होत एकत्रित निकाल ९९.२२% इतका लागला. यामध्ये १ विद्यार्थी O श्रेणी, ४८ विद्यार्थी A+ श्रेणी, ५५ A श्रेणी, १९ B+ श्रेणी, ४ B श्रेणी विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. कु. मैथिली राजेश बोरकर CGPA 10.00 हिने महाविद्यालय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. कु. महाक सईद दावे CGPA 9.93 हिने , कु. मोहिनी महेंद्र सुर्वे CGPA 9.93 यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक कु. श्रुती दिलीप विचारे हिला प्राप्त झाला.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. वाय. के. आवटे, समन्वयक डॉ. एम. आर. साखळकर, विभाग प्रमुख डॉ. एस. एस. कदम, श्रीमती ए. एम. देवस्थळी, प्रा. एस. बी. नागले आणि सर्व प्राध्यापक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.