gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बॉश कंपनीतर्फे तयार केलेल्या कोर्सची पहिली बॅच पूर्ण नवीन बॅच सुरु

gjc-career-guidance-cell-news-june-2022

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने आणि रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्येय अॅकडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट व आर फीज अॅकडमी यांचे संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून दिलेल्या या कोर्सची पहिली बॅच यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ‘ब्रिज’ या नावाचा इम्प्लॉयबिलिटी कोर्स विद्यार्थ्यांमध्ये स्कील डेव्हलपमेंटकरीता बॉश इंडिया लि. या कंपनीने तयार केला आहे. कंपनीच्या सी.एस.आर. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ते विविध महाविद्यालयात राबविला जातो. कोकणात सर्वप्रथम असा कोर्स रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने उपलब्ध करून दिला. महाविद्यालयातील विविध विद्याशाखांमधील २५ विद्यार्थ्यांनी तो यशस्वीरीत्या पूर्ण केला.

कंपनीतर्फे दिलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण सोमवार दि. २० जून रोजी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोर्स यशस्वीरीत्या राबविणारे कंपनी कंपनी सर्टिफाईड प्रशिक्षक सौ. पुजेश्वरी कदम, श्री. राधेय पंडित आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत उपस्थित होते. ब्रिज कोर्सची दुसरी बॅच सुरु करताना त्याचे औपचारिक उद्घाटन मान. प्राचार्यांच्या हस्ते मान्यवर आणि दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्यांनी, ‘विद्यार्थ्यांनी नियोजन तसेच जबाबदारीपूर्वक आपले भविष्य घडविण्यासाठी अशा संधींचा फायदा घेऊन, कष्टाने यशाचा मार्ग चोखाळावा’ असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

Comments are closed.