gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकरिता निवड

महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे आयोजित आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या ‘टाइम्स प्रो’ मार्फत मे २०२२ मध्ये घेतल्या गेलेल्या आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकरिताच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील १५ विद्यार्थी निवडले गेले. बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदाकरिता विद्यार्थ्यांची निवड झाली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे विद्यार्थी बँकेमध्ये विविध ठिकाणच्या शाखांमध्ये रुजू होतील.

सदर मुलाखती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, मुलाखती इ. चा समावेश होता. यासर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. या मुलाखती ‘टाइम्स प्रो’चे श्री. पाटील, ‘ग्लोबल कोथरूड’चे श्री. शहाणे यांनी घेतल्या.

तसेच याचे यशस्वी आयोजन समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.