gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील प्रतिथयश अशा आय.सी.आय.सी.आय.बँकेमधील ‘सिनियर ऑफिसर’ या पदांकरिता नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांमधून निवड झाल्यानंतर बँकिंग कामकाजासंबंधीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेचे मुख्य कार्यालय तसेच रत्नागिरी, चिपळूण आणि इतर ठिकाणच्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची नेमणूक झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मयुरी पांचाळ, आफिफ झारी, स्नेहल मयेकर, सकलीन कुरेशी, गौरी नागवेकर, पूजा मेस्त्री आणि सागरिका महाडिक या सात विद्यार्थांचा समावेश आहे. पुढील कॅम्पस ड्राईव्ह मार्च महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये असल्याची माहिती प्लेसमेंट सेलतर्फे देण्यात आली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावनी यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.