gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ५ मार्च २०२२ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे दि. ५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. हे इंटरव्ह्यू पुणे स्कॉलर कट्टा प्रा. लि. या एज्युकेशन सॉफ्टवेअर आणि सोल्युशन्समध्ये काम करणाऱ्या कंपनीमार्फत महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या कार्यक्षेत्रामध्ये भरावयाच्या पदांकरिता होणार आहे. तरी महाविद्यालयातून २०१९-२०, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये पदवीपरीक्षा उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवीच्या अंतिम परीक्षेला बसणारे विद्यार्थीही उपस्थित राहू शकतात.

तरी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी दि. ५ मार्च रोजी डॉ. र. शं. केळकर सेमिनार हॉल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे

Comments are closed.