gogate-college-autonomous-logo

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात कै. प्रा. के. व्ही. कुलकर्णी यांचा जन्मदिन साजरा

k-v-kulkarni-news

के. व्ही. सर यांच्यासारखे शिक्षक सध्य काळात मिळणे दुर्मिळ असून त्यांच्यासारखा ऋषितुल्य शिक्षक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे मत संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी व्यक्त केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील माजी निवृत्त प्राध्यापक कै. किशोर कुलकर्णी (के. व्ही. सर) यांचा जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी निवृत्त प्राध्यापक के. व्ही. सर यांचा २८ फेब्रुवारी हा जन्मदिन. के. व्ही. सरांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जवळजवळ ४५ वर्ष अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेल्या ४५ वर्षातील सरांचे अनेक मान्यवर विध्यार्थ्यानी महाविद्यालयात येऊन आणि देश-विदेशातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आपल्या लाडक्या शिक्षकाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या शिकवणी संदर्भातील रंजक आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमात के. व्ही. सरांचे त्यावेळचे सहकारी शिक्षक प्रा. औंधकर, प्रा. भास्करे, प्रा. घवाळी, शिक्षकेतर कर्मचारी प्रसाद तथा बापू गवाणकर, १९८५ चे विध्यार्थी आणि मुख्याध्यापक होऊन निवृत्त झालेले श्री. अरुण मुळये, १९९५चे विद्यार्थी आणि एशियन पेंट्सचे अधिकारी श्री. किशोर नातू, २००४ चे विद्यार्थी आणि फाईन ऑरग्यानिक इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक डॉ. केदार कुमठेकर, के. सी. महाविद्यालय मुंबई चे डॉ. राजेश सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

के. व्ही. सरांचे माजी विद्यार्थी, त्यावेळचे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांच्या विषयी लिहिलेल्या लेखांचे ‘स्मृतिगंध’ या पुस्तकाच्या स्वरूपाचे ई- प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे संपादन दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक कैलास गांधी यांनी केले.

के. व्ही. सरांचा जीवनक्रम असलेला लघुपट यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या लघुपटाचे अनुवादन केले. तसेच के. व्ही. सरांची पुतणी सौ. अश्विनी कुलकर्णी मुजुमदार यांनी के. व्ही. सरयांच्यावर एक छान कविता सादर केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी के. व्ही. सरांचे रसायनशास्त्र आणि महाविद्यालयातील असलेलं योगदान, त्यांचे कार्बनी रसायन शास्त्र या विषयांवर आणि विध्यार्थ्यांवर असलेले प्रेम तसेच विद्यार्थ्यांची के. व्ही. सर यांच्यावरची निष्ठा याविषयी आपल मत व्यक्त केलं. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी; प्रास्ताविक रसायन शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मयूर देसाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. उमेश संकपाळ, डॉ. स्वामिनाथ भट्टार, डॉ. मेघना म्हादये, प्रा. प्रतीक्षा बारसकर, प्रा. निकिता पोवार, प्रा. अंकित सुर्वे, प्रा. बरीन आवटे, प्रा. रीना शिंदे, प्रा. तृप्ती जोशी, शिक्षकेतर कर्मचारी श्री. प्रशांत मुरकर, श्री. जगदीश जाधव, श्री. तानाजी बेडक्याळे, श्री. पंडित सोनावणे, श्री. अनंत यादव, श्री. भिमरत्न कांबळे या सर्वांनी तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

सदर कार्यक्रम झाल्यानंतर विध्यार्थ्यांसाठी दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. पहिले व्याख्यान फाईन ऑरग्यानिक इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक डॉ. केदार कुमठेकर sustainability and surfactants याविषयी आणि के. सी. महाविद्यालय मुंबईचे प्रा. डॉ. राजेश सामंत यांनी रसायनशास्त्रातील संधी याविषयी व्याख्यान दिले.

Comments are closed.