gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता इन्शुरन्स क्षेत्रात नोकरीच्या संधी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलमार्फत आणि एन.एस.ई. अॅकॅडमी लि. या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि.च्या दुय्यम कंपनीद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता फायनान्शियल मार्केटबद्दल ओरिएटेशन तसेच इन्शुरन्स क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दि. १५ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे करण्यात आले आहे. या मुलाखती ‘स्टार युनियन डाय-इची लाइफ इन्शुरन्स’ या कंपनीमधील ‘अॅडव्हायजर’ या पदांकरिता रत्नागिरीतील विविध बॅंकांमध्ये इन्शुरन्स कंपनीकरिता करावयाच्या पदांकरिता आहेत. तरी कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत मोबा. ९४२११४२५२९ यांच्याशी संपर्क साधावा. सदर उपलब्ध संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.

Comments are closed.