gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात फिनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातील नोकरीकरिता कॅंपस ड्राईव्ह

महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल तसेच एम. फाईन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. एम. फाईन्स ही कंपनी म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, इक़्विटीज, लोन व इतर वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीत रत्नागिरी येथील व्यवसायाकरिता ‘बिझनेस मॅनेजर’ या पदाकरिता सदर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या मुलाखतींना उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा. इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. २ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे उपस्थित राहावे असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.