gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दि. ६ व ७ मे २०२२ रोजी अनिवासी ‘निसर्ग परिचय शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाची विविध अंगांनी ओळख व्हावी या दृष्टीकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ व ७ मार्च रोजी निसर्ग परीचयासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, पर्यावरणपूरक वस्तू निर्मिती आणि पर्यावरणविषयक प्रकल्प मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गातील प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या दरम्यान निसर्गसहलीचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. वयवर्षे १२ ते १७ या वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात.

निसर्ग परिचय शिबिराविषयी अधिक माहिती आणि प्रवेश यासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे (मोबा. ९४२३२९२०९५) किंवा प्रा. ऋजुता गोडबोले (मोबा. ७०२०५४४००४) यांचेशी संपर्क साधावा.

निसर्गाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.