gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात National Education Policy विषयावर सेमिनार संपन्न

gjc-national-education-policy-webinar-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिक्षक प्रशिक्षण समिती यांच्यातर्फे क्लस्टर महाविद्यालयातील शिक्षकांकरिता दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी “National Education Policy” ह्या विषयावर सेमिनारचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतिशजी शेवडे, उपसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व प्रमुख व्याख्याते प्रो. आर. डी. कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागतप्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले तर पाहुण्यांची ओळख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी केली.

प्रो. आर. डी. कुलकर्णी हे मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू आहेत. त्यांनी प्रोग्राम्स कश्या पद्धतीचे असतील, विद्यार्थ्यांना बकेट लिस्टमध्ये पर्याय कसे उपलब्ध होतील याबद्दल मार्गदर्शन केले. “अकॅडेमीक बँक ऑफ क्रेडिटस” ह्या संकल्पने बद्दल माहिती देताना “एनईपी-२०२०” मार्फत २०३५ पर्यन्त आपल्याला ग्रोस एम्प्लॉयमेंट रेशो ५० % वर नेणे व ड्रॉपआउटचे प्रमाण ० आणणे हे ध्येय आहे हे आवर्जून सांगितले. दहावी नंतर इ. १२वी न करता सर्टिफिकेट ऑफ वोकेशनल कोर्स, आयसिटी यांसारखे विविध पर्याय ह्यामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. एम्प्लॉयबिलिटी च्या दृष्टीने वोकेशनल स्टडीसला नवीन सिस्टम मध्ये १२-१८ क्रेडीट्स अनिवार्य असणार आहेत. तसेच खेळ, सांस्कृतिक हे एक्स्ट्रा-अभ्यासक्रम न राहता ते आता डिग्रीचाच एक भाग होणार आहे असे सांगितले.

एकूणच मसुदा तयार करण्यापासून तो प्रत्यक्षात आणण्यात वाटा असण्याऱ्या व्यक्तीकडून माहीत करून घ्यायला मिळल्याच मत सूत्रसंचालन करताना डॉ. विवेक भिडे यांनी मांडले. ह्या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालायचे ९२ शिक्षक व ८ क्लस्टर महाविद्यालयांचे २२ शिक्षक उपस्थित होते.

विज्ञान विभाग उपप्राचर्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी संस्थेचे पदाधिकारी, प्रो. आर. डी. कुलकर्णी व सर्व महाविद्यालयातील शिक्षक यांचे आभार मानले व “काहीतरी नवीन घडताना चांगली गोष्ट हरवू शकते पण त्याहूनही खूप चांगली गोष्टही आपल्याला मिळू शकते” असा विश्वास व्यक्त केला.

gjc-national-education-policy-webinar-1
gjc-national-education-policy-webinar-2
Comments are closed.