gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन उपक्रमात यशस्वी सहभाग

भारतीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने देशातील ७,५६१ कि. मी. किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीतील मांडवी आणि भाट्ये येथील किनारपट्टीची स्वच्छता करण्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २०० स्वयंसेवकांनी यशस्वी सहभाग घेतला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांबरोबरच पर्यावरण रक्षणाचा महत्वाचा भाग म्हणून शासनातर्फे सागरी किनारा स्वच्छता अभियान राबविले गेले. स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सागरी किनारपट्टी सुरक्षित आणि स्वच्छ राहण्याकरिता आपले योगदान महत्वपूर्ण ठरते. पर्यावरण जाणीव जागृती, पर्यावरण रक्षणासाठी व संवर्धनाची भावना प्रत्येक स्वयंसेवकामधे रुजविण्यासाठी या प्रकारच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आपले योगदान कायम देत असते.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. दानिश गनी, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी, प्रा. सचिन सनगरे आणि विभागातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Comments are closed.