gogate-college-autonomous-logo

संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी – डॉ. किशोर सुखटणकर

gjc-sukhtankar-sir-news-1

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अविष्कार संशोधन उपक्रमाचे आयोजन केले जाते. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अविष्कार संशोधन उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपकेंद्राचे प्र. संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी नुकतेच केले. त्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेचे विविध टप्पे व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी माहिती दिली. संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या मिळणाऱ्या संधी, संशोधन लेख, संशोधन परिषदेतील सहभाग, संशोधन कॉपीराईट, पेटंट इथपर्यंत असणाऱ्या संधी यांचीही माहिती दिली. महाविद्यालयीन, विभागस्तर, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धा, संशोधनाच्या विविध पातळ्या व स्तर यांचीही सविस्तर माहिती दिली.एखाद्या अभ्यास विषयाची प्रेरणा विद्यार्थ्यांना सर्वोच्च स्थानापर्यंत घेऊन जाऊ शकते तसेच संशोधन अभिवृत्ती ही जीवनाच्या अनेक टप्प्यांकरिता उपयुक्त ठरते या विषयी मार्गदर्शन केले.

 

महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध असणारी संशोधन संसाधने विद्यार्थ्यांच्या विकासात योगदान देणारी सून महाविद्यालयाच्या संशोधन विषयक कामगिरीतून ते अनेकवेळा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनास अधिक सक्षम करण्याची महाविद्यालयाची भूमिका कायम असून महाविद्यालय त्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दिले.

या संशोधन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संशोधन व संशोधन स्पर्धा या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामा सरतापे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अजिंक्य पिलणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांच्या उपप्रचार्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाविद्यालयातील अविष्कार संशोधन उपक्रम समन्वयक डॉ. मयूर देसाई, डॉ. भूषण ढाले, प्रा. सचिन सनगरे, प्राध्यापक सहकारी आणि बहुसंख्येने संशोधन प्रेरित विद्यार्थी उपस्थित होते.

 

gjc-sukhtankar-sir-news-2

Comments are closed.