gogate-college-autonomous-logo

मराठी विज्ञान परिषद आणि गणित विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणित कार्यशाळा संपन्न

राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने, मराठी विज्ञान परिषद मुंबई आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७, १८ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरीमधील माध्यमिक शिष्यवृत्ती च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आर. बी. चव्हाण उपस्थित होते. या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या गणित विभागातील प्रा. श्रद्धा सुर्वे आणि प्रा. उमा जोशी याव्याख्यात्या म्हणून लाभल्या होत्या. तीन दिवस चालेल्या या कार्यशाळेत माध्यमिक शिष्यवृत्ती ला सामोरे जाताना तयारी कशी आणि काय करावी याचे सोप्प्या आणि रंजक पद्धतीने व्याख्यात्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. रा. भा. शिर्के प्रशालेच्या माध्यमिक शिष्यवृत्ती ला बसलेल्या 28 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश संकपाळ आणि गणित विभाग प्रमुख प्रा. दिवाकर करवंजे यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आणि सहभागी व्यक्तींचे कौतुक केले.

Comments are closed.