gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची ‘टेक्नोवेव-२०२३’ स्पर्धा संपन्न

technowave-2023-state-level-event

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाने २० आणि २१ जानेवारी २०२३ रोजी टेक्नोवेव२०२३ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (ऑनलाईन), वेब डेव्हलपमेंट, कोड मास्टर आणि गुगल इट (ऑफलाईन) अशा स्पर्धा घेण्यात आल्या. रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ, मंडणगड, तळेरे, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून १० महाविद्यालयातील एकूण ८० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धा सुरू करण्यात आली. गुगल मीटवरुन पहिल्या दिवशी पॉवर पॉईंट स्पर्धां पार पडली. यातील पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी डॉ. राजीव सप्रे तर दुसऱ्या दिवशी वेब डेव्हलपमेंट स्पर्धेसाठी श्री. ऋषिकेश सरपोतदार; आर्यक सोल्युशन, रत्नागिरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. दि. २१ जानेवारी रोजी दु. ३ वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे-
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन:
१) अथर्व उत्तम चव्हाण, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी. – प्रथम क्रमांक.
२) पद्मनाभ विकास भोळे, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी. – द्वितीय क्रमांक.
३) हुमेरा अब्दुलसमद मुकादम, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ – तृतीय क्रमांक.

वेब डेव्हलपमेंट:
१) राहुल रमेश खेडेकर, आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरुख. – प्रथम क्रमांक.
२) दर्पण दीपक मेस्त्री, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ. – द्वितीय क्रमांक.
३) मनोज सुभाष कारेकर, मॉडेल कॉलेज, तळेरे. – तृतीय क्रमांक.

गुगल इट:
१) निनाद विलास शिनगारे, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ – प्रथम क्रमांक.
२) निहार संदीप भुवड, दातार बेहेरे जोशी कॉलेज, चिपळूण. – द्वितीय क्रमांक.
३) योजना प्रकाश वेंगुर्लेकर, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ – तृतीय क्रमांक

कोड मास्टर:
१) वासुदेव कृष्णा गावडे, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ – प्रथम क्रमांक
२) प्रथमेश अनिल पाटकर, संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ – द्वितीय क्रमांक
३) पियुष पांडुरंग बुरटे, दातार बेहेरे जोशी कॉलेज, चिपळूण – तृतीय क्रमांक

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रमाणपत्र व ठराविक रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयटी विभागातील प्रा.अदिती जोशी, प्रा.तेजश्री भावे, प्रा.विदुला भोसले, प्रा.ज्योती यादव, प्रा.मृदुला जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिमरन मुकादम, मंजुळा स्वामी, शिवराज स्वामी, पद्मनाभ भोळे यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून तसेच विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. तसेच लॅब असिस्टंट- शुभम पाटील, लॅब अटेंडंट- निलेश शिंदे यांनीही स्पर्धा यशस्वी करण्यात सहकार्य केले.

कोलते कॉम्प्युटर्सचे श्री. संतोष कोलते, माजी विद्यार्थी सुयश रायकर यांनी प्रत्यक्ष हजर राहून तर श्री. उल्हास पुराणिक (पुराणिक ऑप्टिशियन्स), केजीएन मोबाईल, प्रीतम तोसकर (दादाचा कट्टा), फ्रेंड्स हार्डकोर जिम आणि विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आयटी को-ऑर्डीनेटर डॉ. विवेक भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.