gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘करिअर मार्गदर्शन’पर व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल तर्फे सायन्स विभागातील पदवी आणि पदव्युत्तर सर्व विषयशाखांतील विद्यार्थ्यांकरिता ‘कॅम्पस टू कार्पोरेट-सक्सेसफुल इंटरव्ह्यू’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपेश सावंत यांनी केले. डॉ. विवेक भिडे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.  पुणे येथील श्री. प्रसाद भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंडस्ट्री आणि अॅकॅडमिक्स या दोन्ही क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे त्यांनी महाविद्यालय ते उद्योग व्यवसायामधील चांगल्या पदांकरिता नोकरी मिळण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी उपस्थित असलेल्या १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी सर्व बरकावे आणि घ्यावयाची सर्व काळजी उदाहरणांसह समजावून सांगितली. विद्यार्थ्यांच्या प्रश्न व शंकांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

अध्यक्षीय मनोगत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाला विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापकवर्ग आवर्जून उपस्थित होते.

 

Comments are closed.